चर्चा- ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?
सामान्यतः विवेकवादी विचारवंत विश्वाच्या ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय नाही असे आग्रहाने प्रतिपादन करतात. परंतु टाइम्स ऑफ इंडियाच्या दि. ९ एप्रिल १९९५ च्या रविवार-पुरवणीत ‘सूक्ष्मवैश्विक क्रान्तदर्शने (Microcosmic visions) ह्या शीर्षकाखाली अनुराधा मुरलीधर यांनी जी माहिती दिली आहे ती त्यांना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करायला लावील अशी आहे. मुरलीधर म्हणतात डॉ. अॅनी बीझंट व त्यांचे सहकारी सी. डब्ल्यू. लेडबीटर …